Pages

Wednesday 11 May 2016

आणि आम्ही शाळा रंगवली ....... जिल्हा परिषद शाळा फांगदर ता देवळा जिल्हा नाशिक

आणि आम्ही शाळा रंगवली ....... जिल्हा परिषद शाळा फांगदर ता देवळा जिल्हा नाशिक   

नुकतेच माझ्या शाळेवर पवार सर् बदलून आले होते.आम्ही दोघांनी मिळून शाळेचा चेहरा मोहरा बदलण्याचे ठरवले.आमच्या शाळेचा रंग देवून सात ते आठ वर्ष झाली होती बराचसा रंग फिकट झाला होता. अनेक ठिकाणी भिंतीना पाणी लागून भिंती काळवंडल्या होत्या.मात्र शाळेकडेही पैसा शिल्लक नव्हता.मुख्याध्यापक पवार सरांनी आपल्या कडे पाचसहा हजार रुपयेच शिल्लक असल्याचे सांगितले.एवढ्या बजेटमध्ये संपूर्ण इमारतीला रंग देऊन होणार नव्हता.
       शाळेला रंग दिल्याशिवाय शाळेचा रुपात बदल होणार नव्हते हे तर तितकेच खरे. आणि ठरवले शाळेला रंगरंगोटी करायची. वर्गाना सन २०११-१२ मध्ये अंतर्गत सजावट केली होती त्यामुळे अर्ध्या भिंतींचा प्रश्न निकाली निघणार होता.शाळेला रंगासह मजुरी चौदा ते पंधरा हजार रुपये खर्च येणार होता.
              कमी पैश्यात कुणीही रंगारी,रंग देणारे तयार होणार नव्हते.त्यांची मजुरीच सात आठ हजारात गेली असती.त्यामुळे मुख्याध्यापक पवार सर आणि आम्ही मिळवून ठरवले आपणच आपली शाळा स्वतः रंगवायची.चौथीच्या वर्गातील लहू,प्रवीण ,राजेंद्र,कृष्णा,मयूर,समाधान  ह्या मुलांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले.

आणि आम्ही शाळा स्वतः रंगवायचे ठरवले.सटाण्याहून रंग आणला.आणि चौथीतल्या चारपाच मावळ्याच्या मदतीने आम्ही शाळा रंगवायला घेतली.मुख्याध्यापक आनंदा पवार यांनी स्वतः रंग तयार करून देण्याचे काम केले आणि उपशिक्षक खंडू मोरे, व शाळेतले विध्यार्थी  लहू,प्रवीण ,राजेंद्र,कृष्णा,मयूर,समाधान आदींच्या सहायाने विध्यार्थ्यानी संपूर्ण शाळा आठ दिवसात रंगवली.
   माझ्या विध्यार्थ्याना मी भिंतीचा उंचावरील भाग रंगवून देत होतो .विध्यार्थी जमिनीजवळील तिन साढेतिन फुटापर्यंतचा भाग रंगवून घायचे.तशेच काही ठिकाणी पाहिला हात संपूर्ण विध्यार्थी मारून घायचे.मुलांच्या मदतीने आम्ही दोन वर्गखोल्या.मुख्याध्यापक कार्यालय,मुलांचे स्वच्छता गृह,मुलींचे स्वच्छता गृह ,किचन शेड हे विध्यार्थी ह्या सर्वांच्या मदतीने  रंगवून घेतले.
         त्यात शाळेचा दर्शनी भागाची एक भिंत तशेच दोघा वर्गातील व कार्यालयातील सिलिंग (छपर)फक्त एक कारागीर एका दिवसासाठी मजुरीवर लावत त्याच्याकडून राहिलेले सर्व रंगकाम करून घेतले.
अश्या पद्धतीने शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वतः शाळेला रंग देत शाळेचा रंगकामावरील होणारा अधिकचा खर्च वाचवला व पाच ते सहा हजारात शाळा रंगवून झाली.
               शाळेचे रंगकाम करतांना मला काहीही अनुभव नव्हता. मात्र आनंदा पवार सरांनी आम्हाला रंग तो मिक्स (एकत्रित )कसा करावा मिश्रण कसे करावे हे स्वतः केले.पहिल्या दिवशी पाहिलेली कृती मात्र नंतर विध्यार्थी स्वतः करत होते.रंग तयार करण्याचे काम विध्यार्थ्यानी स्वतः केले पातळ झाल्यावर ते स्वतः रंग घट्ट करत हे कौशल्य मात्र मुलांनी एका दिवसात प्राप्त केले होते.
          इतर विध्यार्थ्यानी आधी वर्गाच्या भिंती आपल्या परीने घासून दिल्यात जिथे भेगा आहेत त्या लांबीने बुजविल्या व नंतर रंग देण्यास सुरुवात केली.अनेक ठिकाणी स्वतः विध्यार्थ्यानी आम्हा शिक्षकांना मार्गदर्शन केले. शाळेतल्या इतरही मुलांनी मग पाणी ,तशेच इतर लहान सहान कामे करण्यात मदत केली.
आमचे रंग देण्याचे काम पाच दिवसात संपले.आणि संपूर्ण रंगवलेली शाळा सर्व  मुलांना व शिक्षकांना खूप आवडली. आम्ही सगळेजण झालेले काम पाहून खूप खुश होतो स्वतः शिक्षक व विध्यार्थ्यानी शाळा कमी खर्चात रंगवून दाखवली होती. रंग कामात मदत करणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांना आम्ही शाबासकी दिली.

कायपण म्हणा  रंग देताना आम्हाला खूप मज्जा आली व रंग द्यायलाही आम्ही शिकलो. आता आमची शाळा व वर्ग नवीन दिसायला लागले होते. आणि शाळा प्रसन्न वाटू लागली होती.कमी पैश्यात आम्ही विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा रंगवू शकलो.वाचवलेला पैसा आम्हाला शाळेला इतर बाबतीत उपयोगी पडणार होता.

मराठी शाळा टिकवण्यासाठी शिक्षक आपल्या परीने काय करू शकतात हे उदाहरण इतरांनाही प्रेरणा देणारे ठरावे व आपल्या शाळांसाठी शिक्षक काय काय करतात हे समजावे म्हणून सहजच पाठवले.आपल्याला रुचले तर तशेच ठेवा,इतरांना पाठवा  अन्यथा डीलेट करा .आज सर्वच क्षेत्रात जाहिरात होतेय आपल्या मराठी शाळां जाहिरातीत कुठेतरी कमी पडताय म्हणून हा प्रपंच आपणा सर्वांचे धन्यवाद
 शब्दांकन –खंडू मोरे उपशिक्षक,
अनमोल सहकार्य -मुख्याध्यापक आनंदा पवार
जिल्हा परिषद शाळा फांगदर ता देवळा जिल्हा नाशिक   

Monday 2 May 2016

आमची शाळा उपक्रमशील शाळा

तालुक्यासह जिल्ह्यातील नावाजलेली उपक्रमशील शाळा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा –फांगदर ता देवळा जिल्हा –नाशिक
येत्या शैक्षणिक वर्ष्यासाठी प्रवेश देणे सुरु

आमच्या शाळेची वैशिष्ठे
+ यावर्षी पहिलीपासून सेमी इंग्रजी वर्ग सुरु
+ पंचक्रोशीत तशेच तालुक्यातील डिजीटल वर्गखोली असलेली तालुक्यातील पाहिली शाळा.
+ सर्व विध्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व शालेय गणवेश,सुवर्णमोह्त्सवी शिष्यवृत्ती योजना.
+ शालेय पोषण आहाराअंतर्गत विध्यार्थ्यांना मध्यानं भोजन योजना व पूरक आहार
+ सर्व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी व सेवा  
+ विविध सहशालेय उपक्रम व क्षेत्रभेटीतुन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन.
+ अभ्यासात माघे पडणाऱ्या विध्यार्थ्यांना अतिरिक्त वैयक्तिक पूरक मार्गदर्शन
+ क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी भरपूर शालेय क्रीडा साहित्य व भव्य मैदान
+ अध्यापनासाठी ईलर्निंग तंत्रज्ञानाचा वापर,संगणक,मोबाईल,लॅपटॉप, टॅबच्या माध्यमातुन शिक्षण देण्याचा प्रयत्न
+ ईलर्निग (डिजीटल)सुविधायुक्त सुसज्य शाळा
+ मजेदार ,मनोरंजक ,वैज्ञानिक खेळणी या माध्यमातुन विध्यार्थ्यांना शालेय गोडी वाढवण्यासाठी प्रयत्न .
+ बोलकी शाळा निसर्गरम्य परिसर
+दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण
+ अनुभवी व समृद्ध शिक्षकवृंद
+ विध्यार्थी उपयुक्त उपक्रमांची मांदियाळी
+ विध्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन
+ ज्ञानरचनावादी  हसतखेळत अध्ययन अध्यापन
+ सर्व विध्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच
+ निसर्गरम्य वातावरण,शालेय आवारातील सुंदर बगीचा व परिसर
+ दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण
त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
प्रगत शिक्षण हाच आमचा ध्यास ................विध्यार्थी व्यक्तीमहत्वाचा सर्वांगीन विकास

आमचा ध्यास.........विध्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास 

Saturday 16 April 2016

मनोगत

१ मनोगत –
मित्रहो नमस्कार पाउल टाकल्याशिवाय पुढयात असलेल्या जाणीव नेनिवांचा संधर्भ लागत नाही.त्याच पद्धत्तीने शैक्षणिक क्षेत्रात काम सुरु केल्याने आपल्या कामातुन आपली ओळख सिद्ध केल्याशिवाय आपले वेगळेपण समाज स्विकारणार नाही.आपण केलेले कार्य इतरांनाही प्रेरक स्वरूपाचे व्हावे, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्या शाळेवरील कार्याची  ओळख  इतरांनाही मिळावी ह्या उद्देशाने मी शैक्षणिक ब्लॉगची निर्मिती केली आहे.
धरूया शिक्षणाची कास करुया वस्तीचा विकास ह्या उदात्त धोरणाने २ एप्रिल २००१ रोजी सुरु झालेली वस्तीशाळा शासनाने शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी उचललेले एक विधायक  पाउल म्हणजेच  माझी शाळा आज तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते.
गेल्या एक दोन वर्ष्यात डीजिटल क्रांतीने शिक्षणाचे संदर्भ बदललेले आहेत. अध्यापनात माहिती  तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज झाली आहे.माहिती तंत्रज्ञानाच्या ह्या नव्या काळात स्मार्ट शिक्षक बनून स्मार्ट विध्यार्थी आपण घडवूताय.माझ्या या ब्लॉगवर माझ्या शाळेच्या विकासात सहाय्यभुत ठरलेले विविध उपक्रम,संगणक व माहिती तंत्रज्ञानातील नवीन बदल व ई लर्निंग विषयक नवीन माहिती अपलोड करण्यात येतील. –श्री खंडू मोरे (उपशिक्षक जिल्हा परिषद नाशिक)

            हा ब्लॉग तयार करतांना मला येणाऱ्या अडचणीवर माझे मित्र ज्ञानदेव नवसारे ,दत्ता अम्रित पाटील,भारत पाटील सर यांनी तशेच राज्यभरातील तंत्रस्नेही शिक्षक मित्रांचे मोलाचे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे व त्यांचे आभार मानतो.